भरधाव टँकरची दुचाकीला धडक : वरणगाव फॅक्टरीतील कर्मचारी ठार : दोघे गंभीर जखमी


Speeding tanker collides with two-wheeler : Varangaon factory worker killed : Two seriously injured भुसावळ : महामार्गावर भरधाव टँकरने दुचाकीला मागून येवून धडक दिल्याने वरणगाव फॅक्टरीतील कर्मचारी ठार झाला. हा अपघात सोमवार, 5 रोजी सायंकाळी पाच वाजता हिरामारोती कपिल वस्ती नगर महामार्गावर घडला. या अपघातात दोघे कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेज. घटनास्थळावरून टँकर चालक पसार झाला. पराग सुरेश राणे (36, शांती नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

भरधाव टँकरच्या धडकेने कर्मचारी ठार
वरणगाव फॅक्टरीतील तीन कर्मचारी सायंकाळी साडेचार वाजेला ड्युटी करुन भुसावळला घरी जात असताना अपघात घडला. मोटरसायकल क्रमांक (एम.एच.19 ए.यू. 6642) वरून रोहित रतन जयराज (32, पंधरा बंगला, रेल्वे क्वार्टर, भुसावळ) व निलेश लिलाधर चौधरी (वसुंधरा नगर, भुसावळ) तर दुचाकी (क्रमांक एम.एच.19 बी.एन.1594) वर चालक पराग सुरेश राणे (शांती नगर, भुसावळ) हे एका मागोमाग जात असताना पराग राणे यांच्या मोटरसायकलला पांढर्‍या रंगाच्या टँकरने भरधाव वेगात मागून धडक दिल्याने तिघे जखमी झाले.



अपघातात पराग राणे यांच्या डोक्याला व मानेला मार लागण्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रोहित जयराज यांच्या फिर्यादीवरून टँकर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !