साकेगाव येथून चोरट्यांनी दुचाकी लांबवली


The thieves stole the bike from Sakegaon भुसावळ : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथून चोरट्यांनी 45 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवल्याची घटना 2 ते 3 फेब्रुवारीदरम्यान घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकींच्या चोर्‍या वाढल्या
संतोष लटकन कोळी (47, शिवशाही नगर, पाण्याच्या टाकीजवळ, साकेगाव) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडील दुचाकी (एम.एच.19 डी.एस.8358) ही घराच्या कुंपणात लावली असताना चोरट्यांनी 2 ते 3 च्या मध्यरात्री संधी साधली. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकीचा तपास न लागल्याने भुसावळ तालुका पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय भोई करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !