स्वयंपाक न केल्याने रावेरात पत्नीवर प्राणघातक हल्ला : पतीविरोधात गुन्हा


Assault on wife in Ravera for not cooking : Crime against husband रावेर  : स्वयंपाक केला नाही म्हणून संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. ही घटना बुधवार, 7 रोजी सकाळी 9.45 वाजता घडली.

मुलाने दिली पित्याविरोधात तक्रार
महात्मा फुले चौकात नंदकिशोर रघुनाथ चौधरी कुटूंबासह वास्तव्याला आहेत. त्यांच्या पत्नी मनीषा नंदकिशोर चौधरी यांनी स्वयंपाक केला नाही याचा राग आल्याने नंदकिशोर यांनी संतापाच्या भरात पत्नी मनिषाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने दोन ते तीन वार करीत गंभीर जखमी केले. याबाबत मुलगा गौरव चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पिता नंदकिशोर चौधरी याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक आशीषकुमार अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सचिन नवले करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !