रावेर तालुक्यातील अल्पवयीन मुलींचा विनयभंग


Rape of minor girls in Raver taluka रावेर : रावेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयीत दीपक जगन्नाथ चौधरी (39, रावेर तालुका) याने दिवाळीपासून आजपावेतो रावेर तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय एका अल्पवयीन मुलीच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून चार ते पाच वेळा वाईट उद्देशाने स्पर्श करीत विनयभंग केला तसेच पीडीतच्या परिवाराला मारून समाजात तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली. याबाबत अल्पवयीन मुलीने रावेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दीपक चौधरीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक दीपाली पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !