भुसावळ शहरातील आरोग्य मंदिरातून दिड लाखांचे लॅपटॉप लंपास
A laptop worth half a lakh looted from Arogya temple in Bhusawal city भुसावळ : शहरातील गडकरी नगर भागातील आयुष्य आरोग्य मंदिरातून चोरट्यांनी दोन लॅपटॉपसह मोबाईल लांबवल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर आरोग्य कर्मचार्यांच्या गोटात प्रचंड भीती पसरली आहे. सुमारे दिड लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबवल्याने याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
खिडकीतून प्रवेश करीत चोरी
शहरातील गडकरी नगर भागात आयुष्यमान आरोग्य मंदिर (दवाखाना) आहे. या दवाखान्याच्या खिडकीतून चोरट्यांनी प्रवेश करीत दवाखान्यातील नर्स कर्मचार्यांचे दोन लॅपटॉप व आरोग्य अधिकारी डॉ.तौफिक शेख यांचा मोबाईल असा एकूण दिड लाख रुपयांचे ऐवज लांबवला. सोमवारी सकाळी दवाखाना उघडल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. चोरट्यांनी रविवारी मध्यरात्रीनंतर चोरी केल्याचा दाट संशय आहे.


चोरट्यांनी दवाखान्यात प्रवेश करीत व्हॅक्सीनेशनचे काही कार्ड जाळले तर अन्य कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकली. बाजारपेठ पोलिसांना माहिती कळताच त्यांनी पंचनामा केला. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.तौफिक शेख यांनी बाजारपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.
