बोरखेडा हत्याकांड प्रकरण : 26 मार्चला विशेष न्यायालयात सुनावणी
Borkheda massacre case: Hearing in special court on March 26 भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांडाची सोमवार, 12 रोजी भुसावळ विशेष न्यायालयात सुनावणी होती मात्र तपास अधिकारी कुमार चिंथा यांची अनुपस्थिती राहिल्याने विशेष न्या.आर.एम.जाधव यांनी आता 26 मार्च रोजी सुनावणीची तारीख दिली आहे.
या खटल्यात आतापर्यंत 27 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात 7आली आहे. 27 मार्च रोजी तत्कालीन पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांची महत्वपूर्ण साक्ष नोंदवली जाणार असल्याची माहिती आरोपीचे वकिल अॅड.सत्यनारायण पाल यांनी दिली.


