सांगवी बुद्रुक शेत शिवारातील विहिरीत पडल्याने 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू


A 70-year-old man died after falling into a well in Sangvi Budruk Shet Shiwar यावल : यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक शेत शिवारातील शेतविहिरीत पाय घसरून पडल्याने 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. वयोवृद्धाला यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिसयात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.लक्ष्मण पुंडलिक कोळी (70, सांगवी बु.॥) असे मयताचे नाव आहे.

अकस्मात मृत्यूची नोंद
कोळी हे शेतशिवारात गेले असता शरद पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ गेल्यानंतर त्यांचा पाय घसरला आणि ते विहिरीत पडले. हा प्रकार निदर्शनास येताच ग्रामस्थांनी विहिरीजवळ धाव घेतली आणि तातडीने त्यांना विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात हलवले. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिसयात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास यावल पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हरीष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !