भुसावळातील खडका चौफुलीवर भीषण अपघात : दोघे ठार


Fatal accident at Khadka Chauphuli in Bhusawal : Two killed भुसावळ : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात जामनेर तालुक्यातील दोघे ठार झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास खडका चौफुलीनजीक घडला. अपघातानंतर ट्रकमध्ये दुचाकी अडकल्यानंतर चालकाने मारहाण होण्याची भीतीने तब्बल 16 किलोमीटरपर्यंत दुचाकी फरफटत नेली मात्र पोलिसांनी नाकाबंदी लावल्यानंतर नशिराबाद टोल नाक्यानजीक ट्रक चालकाला अटक करण्यात आली.

अपघातात दोघे ठार
सूत्रांच्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील दोघे प्लॅटीना दुचाकीवरून जात असताना खडका चौफुलीनजीक भरधाव ट्रकने त्यांना मागून धडक दिली. या धडकेने दोघे जखमी झाले तर अपघातात ट्रकच्या दर्शनी भागात दुचाकी फसल्यानंतर ट्रक चालकाने वाहन तसेच सुसाट पळवले. पोलिसांनी नाकाबंदी केल्यानंतर नशिराबाद टोल नाक्याजवळ ट्रक अडवण्यात आला तर युपीतील चालकाला अटक करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !