भुसावळात नूतन पोलिस अधीक्षकांनी घेतला पोलिस ठाण्यांचा आढावा : इमारतींची केली पाहणी

तीन्ही पोलिस ठाण्यांचा आढावा : इमारतींची केली पाहणी


Rush visit of new Superintendent of Police in Bhusawal भुसावळ : नूतन पोलिस अधीक्षक एमसीव्ही डॉ.महेश्वर रेड्डी यांनी गुरूवारी भुसावळ शहर, बाजारपेठ व तालुका पोलिस ठाण्याला भेट देत इमारतींची पाहणी केली. यावेळी तीन्ही पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकार्‍यांशी त्यांनी संवाद साधत आढावा घेतला. यावेळी पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे उपस्थित होते.

भुसावळात गुन्ह्यांबाबत घेतला आढावा
जळगाव जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी गुरूवारी शहरात सरप्राईज व्हिजीट करीत पोलिस ठाण्यांची पाहणी केली. शहर पोलिस ठाण्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्यांबाबत आढावा पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्याकडून जाणला. यावेळी पोलिस ठाण्यातील विविध भागांना त्यांनी भेटी दिल्या.



शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाला भेट देऊन इमारतीची त्यांनी पाहणी केली. शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली चव्हाण यांनी अधीक्षकांचे स्वागत केले. बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांनी अधीक्षकांचे स्वागत केले. भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात निरीक्षक बबन जगताप यांनी कामाची माहिती दिली. इमारतीची आणि आवाराची पाहणी केली. डीवायएसपी कार्यालयाची पाहणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी माहिती दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !