भुसावळात रेल्वेच्या फिल्टर हाऊसमध्ये विद्युत शॉक लागल्याने अल्पवयीन कामगाराचा दुदैवी मृत्यू


Unfortunate death of minor laborer due to electric shock in railway filter house in Bhusawal भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेला पाणीपुरवठा करणार्‍या फिल्टर हाऊसमध्ये गाळ काढत असतांना क्रेनमध्ये उतरलेल्या विजेचा धक्का लागल्याने अल्पवयीन कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता घडली आहे. या घटनेत अन्य चार कामगार किरकोळ जखमी झाले. सखाराम झिना बारेला (17, रा.गंगापूर, ता.जामनेर) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, रेल्वे प्रकल्पात अल्पवयीन कामगारांना काम मिळालेच कसे? असा प्रश्न उपस्थित होत असून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.

क्रेनमध्ये उतरला विद्युत प्रवाह
भुसावळ रेल्वे विभागाच्या अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पावरा समाज बांधव काम करतात. याच पद्धतीने भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पाणीपुरवठा करणार्‍या फिल्टर हाऊसमध्ये टाकीतून गाळ क्रेनच्या सहाय्याने कामगार काढत असताना क्रेनमध्ये विद्यूत प्रवाह उतरला व सखाराम झिना बारेला याला जोरदार विजेचा झटका बसल्याने त्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला, शिवाय सोबत असलेले इतर चार कामगार हे किरकोळ जखमी झाले असून ते थोडक्यात बचावले आहे. मृताच्या वारसाला नोकरी व मोबदला द्यावा, अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चा संघटनेने केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !