भुसावळात रेल्वे जागेवर आढळली 98 ब्रास वाळू : तहसीलदारांनी बजावली नोटीस
98 brass sand found on railway site in Bhusawal : Notice issued by Tehsildar
भुसावळ : जिल्ह्यात वाळू गटांचे लिलाव झाले नसताना व अवैध वाळू वाहतूक गाजत असतानाच आता भुसावळात रेल्वेच्या जागेवर तब्बल 98 ब्रास मुरूमांचा साठा सापडला असून भुसावळ तहसीलदार निता लबडे यांनी संबंधितांना नोटीस बजावत वाळू साठ्यांबाबत विचारणा केली आहे शिवाय हे वाळू कुठून व कुणी आणली? त्याबाबत ईटीपी पासेस सादर करण्यात यावेत, असे नोटीसीत नमूद केले आहे.
रेल्वे प्रशासनाच्या उपमुख्य अभियंता (निर्माण) यांच्या नावाने नोटीस काढण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने मात्र अद्याप नोटीसीला उत्तर दिले नसल्याचे सांगण्यात आले. रेल्वेच्या हद्दीत पाच ठीकाणी वाळू व मुरूमांचे ढिग मिळून आल्यानंतर त्यांचे पंचनामो महसूल विभागाने केले आहेत.


