हिंगोणा गावाजवळ अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले


A dumper transporting sand illegally was caught near Hingona village यावल : यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ महसुलच्या गस्ती पथकाने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे डंपर जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी पहाटे पूर्वी करण्यात आली. डंपर मालकास दंडाची नोटीस बजावण्यात आली.

कारवाईने उडाली खळबळ
हिंगोणा, ता.यावल या गावाजवळ तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तलाठी ईश्वर कोळी, डोंगरकठोरा तलाठी वसीम तडवी, साकळी तलाठी मिलिंद कुरकुरे हे अवैध गौण खनिज वाहतूक विरोधी गस्ती पथक हे थांबून होते. त्यांना शनिवारी पहाटेपूर्वी यावलकडून फैजपूरकडे जातांना डंपर (क्रमांक एम.एच.31 सी.क्यु.7914) हे दिसल्यानंतर त्यांनी डंपर चालकास थांबण्याचा इशारा केला मात्र चालकाने वाहन न थांबवल्याने डंपरचा पाठलाग करीत काही अंतरावर त्यास पकडले असता वाहनात दिड ब्रास वाळू मिळुन आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने डंपर हेे पथकाने यावल तहसीकार्यालयात जमा केले. वाहन मालक किरण वसंत बादशह यांना दंडाची नोटीस बजावण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !