साकेगावनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेने बर्हाणपूर जिल्ह्यातील महिलेचा मृत्यू
A woman in Barhanpur district died after being hit by an unknown vehicle near Sakegaon भुसावळ : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे अज्ञात वाहनाने महामार्ग ओलांडणार्या महिलेसह पुरुषास धडक दिल्याने अपघातात नंदाबाई किसन दांडगे (43, रा.शेखपुरा, ता.खकनार, जि.बर्हाणपूर) यांचा मृत्यू झाला.
हा अपघात बुधवार, 14 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार संजय भोई करीत आहेत.


