भुसावळ तालुका पोलिस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षकपदी विशाल पाटील


Vishal Patil as Assistant Inspector of Bhusawal Taluka Police Station भुसावळ : जिल्ह्यातील चौघा अधिकार्‍यांच्या जळगाव पोलिस अधीक्षकांनी बदल्या केल्या आहेत. याबाबतचे आदेश रविवारी सायंकाळी काढण्यात आले आहेत. मुंबई पोलिस दलातून रूजू झालेले विशाल पाटील यांची भुसावळ तालुका पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्याचे सहाय्यक निरीक्षक अमोल पवार यांची एरंडोल पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आल्याने हे पद रीक्त होते.

या अधिकार्‍यांच्या झाल्या बदल्या
यावलचे निरीक्षक राकेश मानगावकर यांची नियंत्रण कक्षात, रावेरचे सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला यांची पोलिस अधीक्षकांचे रीडर म्हणून तर रावेरचे सहाय्यक निरीक्षक हरीष भोये यांची यावल पोलिस ठाण्याच्या तात्पुरता प्रभारी म्हणून बदली करण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !