खिरोद्यात दोन तर चिनावलला एकाचवेळी पाच घरे फोडली


Two houses were broken into in Khiroda and five houses were broken into in Chinaval simultaneously सावदा : सावदा शहरासह परीसरात गेल्या एक महिन्यांपासून घरफोडीचे सत्र कायम आहे. शनिवारी रात्री पुन्हा एकदा परिसरातील चिनावल येथील पाच बंद घरे वतर खिरोदा येथील दोन बंद घरे चोरट्यानी फोडल्याने खळबळ उडाली.

चिनावल येथे पाच ठिकाणी घरे फोडली
चिनावल गावातील बंद असलेल्या पाच घरांना चोरट्यांनी टार्गेट केले. काही घरामध्ये चोरट्यांनी कपाट, लॉकर तोडत रोकड लांबवण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने यात काहीही हाती लागले नसल्याचे सांगण्यात आले तर भर वस्तीत ही घरे फोडण्यात आल्याने रहिवासी धास्तावले आहेत. चिनावल येथील प्लॅट एरीयात फोडलेली सर्व घर ही बंद होती. घरमालक बाहेरगावी असल्याचा फायदा चोरट्याीं साधला. यात पत्रकार मिलिंद टोके, मिलिंद कुरकुरे, खेमचंद लोखंडे, चौधरी व अन्य रहिवासी बाहेरगावी असल्याने या घरांना चोरट्यानी लक्ष केले.



खिरोद्यात दोन ठिकाणी घरे फोडली
चिनावल येथे चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसलेतरी खिरोदा येथील हरी नगरातील धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पितांबर महाजन यांच्या घराचे कुलूप कोयंडे तोडून घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करत चार तोळ्याची मंगल पोत, पाच ग्रॅम कानातील झुमके, एक तोळ्याची चैन, पंचवीस हजार रुपये कॅश असा अंदाजे चार लाखांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला. अजून एकाचे घर
फोडण्यात आले मात्र चोरलेल्या मालाचा तपशील कळू शकला नाही.

सावद्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी दिवसभरात घटनास्थळी तपास यंत्रणा गतिमान केली तसेच ग्रामस्थांसह ग्रामपंचायत प्रशासनाला सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना केल्या व बाहेरगावी गेल्यास घरात कोणत्याही मौल्यवान वस्तू ठेवू नये म्हणून महिलांचे प्रबोधन केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !