एक लाखांचे लाच प्रकरण : चुंचाळेतील पसार ग्रामसेवकाला जळगाव एसीबीकडून अटक


One lakh bribe case: Pasar Gram Sevak from Chunchal arrested by Jalgaon ACB यावल : स्वावलंबन योजनेचा निधी मंजूर झाल्यानंतर त्यापोटी बक्षीस म्हणून एक लाख रुपये लाच मागितल्यानंतर लाच रक्कम स्वीकारल्या प्रकरणी चुंचाळे ग्रामपंचायतीचा ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी (35, चुंचाळे) यास जळगाव एसीबीने अटक केली होती तर सापळ्याची कुणकुण लागल्याने चुंचाळे ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी (चुंचाळे) हे पसार झाले होते. लाचेचा सापळा शनिवार, 17 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जळगाव एसीबीने यशस्वी केला होता.

एक लाखांच्या लाच प्रकरणाने खळबळ
चुंचाळे येथील 46 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, चुंचाळे, ता.यावल गावी त्यांच्या वडिलांच्या नावाची संस्था असून त्यामध्ये 15 वित्त आयोगाच्या शिफारशीतून गावात शिलाई मशीन प्रशिक्षण देवून ग्रामीण भागातील महिला व युवतींना स्वावलंबी करण्यासाबाबत केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता. मंजूर निधीतून तब्बल 50 टक्के बक्षीस म्हणून एक लाखांची लाच ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी शुक्रवार, 16 रोजी मागितली होती. तक्रारदाराने याबाबत शुक्रवारी जळगावी तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली. ग्रामसेवक जोशी यांनी लाच रक्कम ऑपरेटरकडे देण्यास सांगितल्यानंतर सुरूवातीला ऑपरेटरला अटक करण्यात आली मात्र ग्रामसेवकाला सापळ्याची कुणकुण लागताच ते पसार झाल्याने उभयंतांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.



पसार ग्रामसेवकाला अखेर अटक
रविवारी दुपारी ग्रामसेवक हेमंत जोशी यांना जळगाव एसीबीने अटक केली असून सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास प जळगाव पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे व सहकारी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !