विषारी औषध प्राशन केल्याने भुसावळातील प्रौढाचा मृत्यू
Death of an adult in Bhusawal due to ingestion of poisonous drug भुसावळ : काहीतरी विषारी औषध प्राशन केल्याने भुसावळातील 47 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शेख रमजान शेख जाफर (बर्हाणपूर, मध्यप्रदेश, ह.मु.रेल्वे लोखंडी पुलाजवळ, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. 5 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 11.30 वाजता शेख रमजान याने विषारी औषध सेवन केल्याने त्यास जळगाव सिव्हीलला हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर उशिराने कागदपत्रे बाजारपेठ पोलिसांकडे आल्यानंतर ही नोंद वर्ग करण्यात आली. तपास हवालदार तेजस पारीसकर करीत आहेत.


