पिंप्राळा शिवारातील पूर्णा नदीपात्रात आढळले अनोळखी पुरुषाचे प्रेत


The dead body of an unknown man was found in the Purna riverbed in Pimprala Shiwar मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा शिवारातील धुपेश्वरानजीक पूर्णा नदी पात्रात एका अनोळखी 50 वर्षीय इसमाचे प्रेत आढळल्याने परीसरात खळबळ उडाली आहे. अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
सोमवार, 19 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पिंप्राळा शिवारातील नदीकाठी पुलाजवळ नदीत पुरुष जातीचे प्रेत तरंगताना शेतकर्‍यास निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ पिंप्राळा येथील पोलीस पाटील महादेव निवृत्ती झाल्टे यांना कळवले व पोलीस पाटलाने ही बाब कुर्‍हा पोलिसांना कळवली. पाण्यात मृतदेह कुजल्याने जागेवरच पीएम करून अंत्यसंस्कार करण्यात आले. अनोळखीची उंची पाच फूट, 45 ते 50 तर अंगात काळ्या रंगाचे स्वेटर, राखाडी रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पँट आहे. पिंप्राळा पोलीस पाटील महादेव झाल्टे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !