उचंदा शिवारात वनहद्दीत मुरूम उत्खनन : जेसीबी जप्त
Murum Excavation in Uchanda Shivarat forest boundary : JCB seized मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा शिवारात अवैधरीत्या मुरूम उत्खनन सुरू असताना वनविभागाने कारवाई करून जेसीबी ताब्यात घेतला. उचंदा शिवारात वनविभागाच्या वन कक्ष क्रमांक 590 ई हद्दीत अवैध प्रमाणात मुरूम उत्खनन जेसीबीच्या सहाय्याने सुरू असल्याची माहिती वनविभागाला कळताच वनविभागाने कारवाई केली.
चालक-मालकाविरोधात गुन्हा
जेसीबी ताब्यात घेण्यात आला असून चालक-मालक यांच्याविरुद्ध वनविभागाने गुन्हा दाखल केला. ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक उमेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी परीमल साळुंखे, वनपाल जी.डी.गवळी, वनरक्षक आर.एल.असुरे, वनपाल डी.एस.पवार, एस.एन.कोळी, एस.एस.मोरे, एस.एल.गोसावी, वनमजूर संजय कोळी, योगेश बोरसे यांनी केली.


