यावल विरावली रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक : वाहन जप्त, मालकाला नोटीस


Illegal transport of sand on Yaval Virawali Road : Vehicle impounded, notice to owner यावल : यावल तालुक्यातील विरावली रस्त्यावर महसूल विभागाच्या गस्ती पथकाने अवैध वाळू वाहतूक करतांना टाटा इन्स्ट्रा वाहन जप्त केले. याप्रकरणी वाहन मालकास दंडाची नोटीस बजावण्यात आली. सातत्याने महसूल विभागाकडून वाळू वाहतुकीविरूध्द होत असलेेल्या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

वाहन जप्त
विरावली रस्त्यावर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसुलचे गस्ती पथक वाहन तपासणी करीत होते. त्यांना विरावलीकडे अवैध वाळू नेतांना टाटा इन्स्ट्रा वाहन (क्रमांक एम.एच. 19 सी.एक्स. 1135) हे दिसताच पथकाने वानह अडवले. पथकातील तलाठी ईश्वर कोळी, वसीम तडवी, मिलिंद कुरकुरे यांनी चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता परवाना नसल्याने वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. वाहन मालक चैत्राम कोळी (रा.कोळन्हावी) यांना दंडाची नोटीस बजावण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !