रावेर पोलिसांची मोठी कारवाई : कत्तलीसाठी जाणार्‍या 34 म्हशींची सुटका


Raver Police’s big action: Rescue of 34 buffaloes going for slaughter रावेर : कत्तलीच्या उद्देशाने जाणार्‍या 34 म्हशींची रावेर पोलिसांनी सुटका करीत ट्रक जप्त केला तर त्रिकूटाविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

34 म्हशींची सुटका ; त्रिकूटाविरोधात गुन्हा
रावेर-बर्‍हाणपूर रस्त्यावर खानापूर गावाजवळील आरटीओ चेक नाक्याजवळ अवैध गुरांची वाहतूक करणारी (ट्रक क्र.एम.पी.09 जी.0871 व एम.पी.41 जी.ए.3029 व सी.जी.04 एन.एस.2004) पोलिसांनी अडवल्यानंतर त्यात गुरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याचे आढळल्याने व कुठलाही गुरे वाहतुकीचा परवाना नसल्याने पोलिसांनी 34 म्हशींची सुटका केली. 10 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 34 म्हशी व 15 लाख रुपये किंमतीचे ट्रक पोलिसांनी जप्त केले.



याबाबत पोलीस कॉस्टेबल दीपक ठाकूर यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पशुसंवर्धन कायद्यान्वये गोविंद रमेश शिसोदिया (देवास), देवसिंग बाबूलाल भाटीया (रा. नागदा), इकबाल साबीर बेग (नागदा पनवाडी, तिघेही मध्य प्रदेश) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार राजेंद्र राठोड करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !