वावडदासह जळगावातून भंगार साहित्याची चोरी : आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Theft of scrap material from Jalgaon with Vavadada : MIDC police handcuffed the accused जळगाव : वावडदा गावातील मारुती मंदिराच्या बांधकाम स्थळावरून सेंट्रींग बांधकामाचे साहित्य चोरीला गेल्यानंतर पोलीस पाटील विनोद तुळशिराम गोपाल यांनी फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामस्थांच्या भावनांची दखल घेत तपासचक्रे वेगाने फिरली अन चोरट्यांना अवघ्या 48 तासात एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सागर विनोद चव्हाण (32) व विनोद रमेश गोपाळ (25, दोन्ही रा.वावडदा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून बांधकामाचे साहित्य जप्त करण्यात आले.
पुरूषोत्तम नगरातील चोरीचाही उलगडा
जळगाव शहरातील पुरुषोत्तम नगर, शिरसोली नाका येथे अजय ओमप्रकाश जोशी यांचे सुरू असलेल्या बांधकामाच्या साईटवरुन बुधवार, 21 रोजी 29 हजार रुपये किंमतीची आसारी, लॉखडी सेंट्रींग प्लेटा चोरीला गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही चोरी शेख फैयाज शेख शमसोद्दीन (36, फुकटपुरा, तांबापुरा) याने केल्याची माहिती कळताच त्यास अटक करण्यात आली तर संशयिताने चोरीचा माल भंगार व्यावसायीक शेख रहिम शेख खलील (24, बॉम्बे बेकरीजवळ, मलीक नगर, जळगाव) यास विकल्याची माहिती दिल्यानंतर त्यासही गुन्ह्यात आरोपी करून अटक करण्यात आली.


यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात एपीआय आसाराम मनोरे, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, एएसआय अतुल वंजारी, हवालदार रामकृष्ण पाटील, प्रदीप पाटील, स्वप्नील पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, राहुल रगडे, विशाल कोळी, मनोज पाटील, महिला अंमलदार राजश्री बावीस्कर यांच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या बांधल्या.