भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात श्री संत गाडगे बाबा जयंती उत्साहात


भुसावळ : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे श्री संत गाडगे बाबा यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. प्रतिमेचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांच्याहस्ते करण्यात आले.

संत गाडगेबाबांकडून स्वच्छतेबाबत जनजागृती
प्राचार्य फालक म्हणाले की, गाडगेबाबा यांनी जनमानसात स्वच्छतेबद्दल जनजागृती केली. इतरांना उपदेश देण्यापेक्षा स्वतः कृती मधून त्यांनी समाजाला स्वच्छतेचे धडे दिले. ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांमध्ये पसरलेल्या अंधश्रध्दा, देवाच्या नावावर होणारी फसवणूक आणि शोषण, याबाबत त्यांनी किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे करण्यात आले. प्रास्ताविक प्रा.डॉ.आर.बी.ढाके तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधुरी पाटील तसेच आभार प्रा.डॉ.दयाघन एस.राणे मानले. राजेश निकम, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.जागृती सरोदे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रकाश सावळे , शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी कळविले आहे.


कॉपी करू नका.