मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची होणार एस.आय.टी.चौकशी : मुख्यमंत्री म्हणाले ; सत्यता समोर येणार !


Manoj Jarange Patal’s agitation will be investigated by SIT : Chief Minister said ; The truth will come out! मुंबई  : मनोज जरांगे पाटील यांची भाषा योग्य नाही. हे करा, ते करा, ही भाषा योग्य नाही शिवाय कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बजावले. आरक्षण टिकणार नाही याची चर्चा करत आहोत मात्र, ते का टीकणार नाही? याचे कारण कोणीही देत नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आंदोलन काळात कुणी दंगल घडवली? कुणी दगड गोळा केले, कोणी दगड मारायला लावली, या सर्व गोष्टी लपत नसतात. रात्री कोण भेटले, का भेटले हे सर्व लपत नसते, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करीत हे सर्व प्रकार आता एसआयटी चौकशीतून समोर येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

सरकार हातावर हात ठेवून बसणार नाही
आंदोलनादरम्यान आमदारांचे घर जाळू लागले, घरात फॅमिली असताना घरांना आग लावली. एसटी महामंडळाच्या बस जाळण्यात आले. मालमत्तांचे नुकसान केले, अशा परिस्थितीत सरकार हातावर हात धरून बसू शकत नाही. उच्च न्यायालयाने देखील सांगितले होते की, सरकारचं काम कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे आहे. सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणावरही अन्याय करू शकत नाही. सरकार हात धरुन बसू शकत नव्हते. आमची भूमिका प्रामाणिक होती. आमचे मंत्री, सर्व अधिकारी, स्वतः मुख्यमंत्री तिथपर्यंत गेले होते. मात्र, कायद्याचे चौकटीमध्ये बसणारच नाही त्याची मागणी करणे योग्य नसल्याचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.

जरांगे पाटलांच्या तोंडून कुणाची भाषा ?
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काम करणारे होते त्यांनी पुढे आणले. कुठल्याही गोष्टी लपत नाही. दगडफेक झाली त्याचाही अहवाल समोर आला आहे. आतापर्यंत सरकार्रीी सहानुभूती ठेवली होती. जाळपोळ करायला लागले, आमदारांची घरे जाळली. मालमत्तेचे नुकसान केले. अशा परिस्थितीत सरकारने हातावर हात ठेऊन गप्प बसायचं का? प्रामाणिकपणे आंदोलन होते, तोपर्यंत मुख्यमंत्र्यापासून सगळे गेले पण कायद्याच्या बाहेरची मागणी करणे हे योग्य आहे का? देवेंद्र फडणवीसांबाबत जे जरांगे पाटील बोलले ती भाषा कुणाची आहे? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.

अंबादास दानवे यांना प्रत्त्युत्तर
अंबादास दानवे यांनी मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांबद्दल बोलले नसल्याचं म्हटलं होते. तर जरांगे हे केवळ फडणवीस यांच्या बद्दल बोलले असल्याचे सांगितले हाते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल देखील अपशब्द वापरले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, आमच्यात अशी फुट पडणार नाही. उपमुख्यमंत्र्यांबद्दल जरी बोलले असतील तर सरकार म्हणून ती आमची जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हा राज्याचा विषय आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सरकार याच्याकडे दुर्लक्ष करणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


कॉपी करू नका.