पाडळसा गावातील तरुणाला तलवारीसह पकडले : फैजपूर पोलिसांची कारवाई


Youth of Padalsa village caught with sword : Faizpur police action यवल  : यावल तालुक्यातील पाडळसा गावातील तरुणाला फैजपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यानी तलवार बाळगल्या प्रकरणी अटक केली. प्रवीण उर्फ डॉन गोपाळ तायडे (28, पाडळसा, ता.यावल) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांना संशयित प्रवीण तायडे हा कोसगाव रस्त्यावरील सार्वजनिक चौकात 3 रोजी दुपारी 12.35 वाजता तलवारीच्या धाकावर आरडा-ओरड करीत असल्याची माहिती मिळताच त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. संशयीताल पथकाने तलवारीसह ताब्यात घेतले. विशेष म्हणजे संशयिताने त्याच्या साथीदारासह 27 फेब्रुवारी रोजी सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील चुनवाडे शेत शिवारातुन बकरी चोरी केल्याने सावदा पोलिसात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.



यांनी केली कारवाई
ही कारवाई फैजपूरच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक निलेश वाघ, परीवेक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे, हवालदार विकास सोनवणे, हवालदार मोती पवार, हवालदार बाळू भोई, ाहुल महाजन, चालक सहा.फौजदार अरुण नमायते आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !