यावल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी स्वीकारला पदभार
Police Inspector Pradeep Thakur assumed charge at Yaval Police Station यावल : यावल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी रावेचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांची नुकतीच बदली करण्यात आली होती. आदेशानंतर गुरुवारी रात्री नऊ वाजता त्यांनी पोलीस ठाण्यात हजर होते सहा.निरीक्षक हरीष भोये यांच्याकडून पदभार स्वीकारला.
कायदा-सुव्यवस्थेला प्राधान्य देणार
आगामी काळात कायदा व सुव्यवस्थेसाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असून शहर व पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेऊ, असे प्रसंगी त्यांनी सांगितले. दहिगाव येथील पोस्टर विटंबना प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची इथून बदली झाल्यानंतर येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पद रीक्त होते. या जागेवर ठाकूर यांनी यांची बदली करण्यात आल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला आहे.



