प्रकल्प अहवालासाठी दहा हजारांची लाच भोवली : जळगावातील महिला एसीबीच्या जाळ्यात

धुळे एसीबीची जळगावात कारवाई : लाचखोरांच्या गोटात खळबळ


Bribe of ten thousand for project report: Jalgaon women in ACB’s net जळगाव : जळगाव जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकार्‍यांच्या नावे 30 हजारांची लाच मागून तडजोडीअंती दहा हजार रुपये लाच स्वीकारणार्‍या जळगावातील खाजगी महिला विद्या परेश शाह (38, रा.जुने भगवान नगर, जळगाव) यांना धुळे एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. बुधवार, 13 मार्च रोजी दुपारी सव्वादोन वाजेच्या जळगाव जिल्हा उद्योग केंद्राच्या आवारात हा सापळा यशस्वी करण्यात आला.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे मौजे पुरी, ता.रावेर येथे वडीलोपार्जित बागायत शेतजमीन आहे. या शेत जमितीत दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी व म्हशी विकत घेण्यासाठी कर्ज हवे हवे असल्याने त्यांनी दहा दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा उद्योग केंद्रात संपर्क साधला असता तेथे संशयित विद्या परेश शाह (खाजगी महिला) यांनी तक्रारदार यांना त्यांची जळगांव कार्यालयातील अधिकार्‍यांशी ओळख असल्याचे भासवले व कर्ज प्रकरण मंजूर करून देण्यासाठी प्रोजेक्ट रीपोर्टसह अधिकार्‍यांना देण्यासाठी 30 हजार रुपये लाच मागणी केली. याबाबतची तक्रार मंगळवार, 12 रोजी धुळे एसीबीकडे करण्यात आल्यानंतर बुधवारी सापळा रचण्यात आला. डीआयसी केंद्राच्या आवारात दुपारी 2.15 वाजता विद्या शाह यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीखक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळ्यातील पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, कविता गांगुर्डे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


कॉपी करू नका.