धुळ्यात डॉ.सुभाष भामरे तर नंदुरबारमध्ये डॉ.हिना गावीतांना संधी : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 20 उमेदवार जाणून घ्या


Chances for Dr. Subhash Bhamre in Dhulai and Dr. Hina Gavit in Nandurbar : Know 20 Contenders in Maharashtra in Lok Sabha Elections मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर भाजपाने अत्यंत सावधपणे आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अनेकांना डच्चू देण्यात येईल, अशी शक्यता असताना अनेक जागांवर भाजपाने विद्यमान खासदारांना संधी दिली आहे. भाजपाच्या पहिल्या 195 उमेदवारी यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांना संधी नसलीतरीत्र दुसर्‍या यादीत महाराष्ट्रातील 20 जणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे भाजपाने विद्यमान खासदारांनाच संधी दिली आहे. धुळ्यातून डॉ.सुभाष भामरे तर नंदुरबार मतदारसंघातून डॉ.हिना गावीत यांना संधी देण्यात आली आहे.

जळगावात उन्मेश पाटील यांचे तिकीट कापले
जळगाव व रावेर मतदारसंघातील विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाण्याची जोरदार चर्चा होती मात्र मेरीटमध्ये खासदार रक्षा खडसे आघाडीवर राहिल्याने त्यांना पुनश्च तिसर्‍यांदा संधी मिळाली तर जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली आहे. या शिवाय दिंडोरीतून डॉ.भारती पवार यांना तिकीट जाहीर करण्यात आले.

जाणून घ्या राज्यातील 20 उमेदवार

रावेर – रक्षा खडसे
जळगाव – स्मिता वाघ
धुळे – सुभाष भामरे
नंदुरबार – डॉ. हिना गावित

चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
जालना- रावसाहेब दानवे
बीड- पंकजा मुंडे
पुणे- मुरलीधर मोहोळ
सांगली- संजयकाका पाटील
माढा- रणजीत निंबाळकर
उत्तर मुंबई- पियुष गोयल
उत्तर पूर्व – मिहीर कोटेचा
नांदेड – प्रतापराव चिखलीकर
अहमदनगर- सुजय विखे पाटील
लातूर – सुधाकर श्रृंगारे
दिंडोरी – डॉ. भारती पवार
भिवंडी – कपिल पाटील
वर्धा – रामदास तडस
नागपूर- नितीन गडकरी
अकोला – अनुप धोत्रे

यांचे कापले तिकीट
बीडमधून पंकजा मुंडे यांना तिकीट मिळाले असलेतरी त्यांच्या बहिण प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलं गेलं आहे. दुसरीकडे उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात आमदार मिहीर कोटेचा यांना तिकीट देऊन, भाजपने मनोज कोटक (चरपेक्ष घेींरज्ञ) यांना धक्का देण्यात आला. अकोल्यात खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी मुलगा अनुप धोत्रे यांना तिकीट दिलं.


कॉपी करू नका.