धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील शंभरावर पोलिसांना अन्नातून विषबाधा


100 policemen poisoned by food at Dhule Police Training Centre धुळे  : धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सुमारे शंभरावर पोलीस बांधवांना गुरुवारी रात्री जेवणातून विषबाधा झाल्यानंतर सर्वांना तातडीने उपचारासाठी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यातील सुमारे पाचवर पोलिसांना अति त्रास होत असल्याची माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजीराव भामरे यांनी दिली. याबाबतची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी बाधीत पोलिसांची भेट घेत त्यांची विचारपूस केली.

अन्नातून झाली विषबाधा
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलिसांना सायंकाळी वरण-भात आणि फ्लॉवरची भाजी, चपातीचे जेवण देण्यात आले मात्र काही वेळेतच शंभरावर पोलिसांना मळमळ, उलट्या, ब्लड प्रेशर कमी होणे यासारख्या विविध प्रकारचा त्रास जाणवू लागला. यानंतर तत्काळ पोलिसांना भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.


कॉपी करू नका.