तीन हजारांची लाच भोवली : शहादा भूमी अभिलेखचा शिपाई एसीबीच्या जाळ्यात


Bribe of 3000 rupees: Shahada land record constable in ACB net  शहादा : तीन हजारांची लाच घेताना शहादा भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला नंदुरबार एसीबीने अटक केली आहे. विनोद बाळू शिंदे (रा.सावखेडा, ता.शहादा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
वरूळकानडी, ता.शहादा येथील 42 वर्षीय तक्रारदार यांच्या वडीलोपार्जीत शेतजमिनीची 4 ऑक्टोबर 2023 रोजी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करण्यात आली होती परंतू काही कारणास्तव तक्रारदार यांना सदर शेतजमिनीची पुन्हा फेरमोजणी करावयाची असल्याने फेरमोजणीच्या अर्जासह भूमी अभिलेख कार्यालय येथे आल्याने भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई विनोद शिंदे यांनी तक्रारदार यांना तुम्ही अर्ज करू नका, मी तुमचे शेतात येऊन मोजणी करून देतो, त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला तीन हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली. 13 रोजी याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली. शनिवारी दुपारी शिपाई शिंदे यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक माधवी समाधान वाघ, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, विलास पाटील, विजय ठाकरे, हेमंत महाले, सुभाष पावरा, संदीप खंडारे, जितेंद्र महाले आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


कॉपी करू नका.