गाडर्या येथे भोंगर्या बाजारात आलेल्या 40 वर्षीय महिलेचा विनयभंग
A 40-year-old woman who came to Bhongrya market was molested at Gadarya यावल : यावल तालुक्यातील गाडर्या येथील भोंगर्या बाजारात 40 वर्षीय महिलेचा एकाने विनयभंग केला. महिलेसोबत संशयिताने बाजारात वाद घातला आणि शिवीगाळ करून मारहाण करीत महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिविगाळ करीत केला विनयभंग
गाडर्या येथे रविवारी भोंगर्या बाजार होता. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास 40 वर्षीय महिला आली असता आपश्या भायसिंग सस्ते – बारेला (रा.कुंभी, ता.भगवानपुरा, जि.खरगोन, मध्यप्रदेश) याने वाद घातला व महिलेस शिवीगाळ करीत मारहाण केली व जिवेठार मारण्याची धमकी देत तिचा हात ओढून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईलण असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. महिलेने यावल पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिल्यानंतर आपश्या सस्ते- बारेला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.

