जळगावातील ड्रग्ज प्रकरण : दोघा आरोपींना पोेलीस कोठडी


Drug case in Jalgaon : Two accused taken into custody जळगाव : जळगावात पकडलेल्या एम.डी.ड्रग्स प्रकरणी दाखल गुन्ह्यात इम्रान उर्फ इम्मु हुसेन भिस्ती (25, रा.शाहुनगर) व गोकुळ उर्फ रघु विश्वनाथ उमप (40, रा.कंजरवाडा) यांना अटक करण्यात आल्यानंतर मंगळवार, 26 रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरुवार, 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आज दोघांची कोठडीची मुदत संपल्याने तसेच गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वाढीव कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.पंढरीनाथ चौधरी यांनी युक्तीवाद केला.


कॉपी करू नका.