हे न्यायालय पार्लर नव्हे ! शिरसाड चोरी प्रकरणातील आरोपीला खडसावले : एका दिवसाची सुनावली पोलीस कोठडी


This court is not a parlor! Accused in Shirsad theft case reprimanded: Sent to police custody for one day यावल : यावल तालुक्यातील शिरसाड येथे पानटपरीत चोरी करताना फैजान उर्फ दानिश खान आरीफ खान (19, रा.तांबापुरा, जळगाव) यास अटक करण्यात आली होती चौघे पसार झाले होते. संशयीत फैजान याला सोमवारी यावल न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. बुधवारी कोठडी संपल्याने संशयीताला न्यायालयात हजर केले असता हिरकणी कक्षातील आरश्यात पाहून आपले केस सावरत असताना न्यायाधीशांनी त्यास खडसावले व त्यास पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.


कॉपी करू नका.