भुसावळात अंगावर रंग टाकण्यावरून हाणामारी : दोघांविरोधात गुन्हा


Clash over body paint in Bhusawal : Crime against two भुसावळ : रंगपंचमीच्या दिवशी अंगावर रंग टाकण्याच्या वादातून तरुणाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
अक्षय दिलीप जाधव (28 शिवाजी नगर, भुसावळ) या तरुणाच्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ आकाश याने संशयितांच्या अंगावर रंग टाकल्याच्या वादातून आरोपींनी शिविगाळ केली तसेच लाकडी दांड्याने भावाच्या मानेवर मारहाण केली तसेच हाता-पायावर मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी मुकेश तिवारी व राजेश तिवारी (पूर्ण नाव माहित नाही, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार समाधान पाटील करीत आहेत.


कॉपी करू नका.