भुसावळ शहरातील अल्पवयीन तरुणीला पळवले


A minor girl was abducted from Bhusawal city भुसावळ : शहरातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीला अज्ञाताने पळवून नेल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी 9.30 वाजता घडला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या मामीने बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
शहरातील एका भागात 17 वर्षीय तरुणी मामीकडे वास्तव्याला होती. मंगळवारी सकाळी 9.30 ती डी.एस.हायस्कूलमध्ये परीक्षेसाठी गेली मात्र दुपारी दिड वाजता पेपर सुटल्यानंतरही तरुणी घरी न परतल्याने तिचा शोध घेण्यात आला तसेच तरुणीच्या मैत्रिणींना विचारणा केल्यानंतर तरुणी परीक्षा दिल्यानंतर बाहेर पडल्याचे सांगण्यात आले. तरुणी घरी न परतल्याने तिला कुणीतरी पळवून नेल्याचा संशय असल्याने अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुपडा पाटील करीत आहेत.


कॉपी करू नका.