रावेर पोलिसांनी रोखली देशी दारूची अवैध वाहतूक : आरोपीला अटक


Two-wheeler of country liquor seized by Raver police रावेर : दुचाकीवरून दारूची चोरटी वाहतूक करणार्‍या मध्यप्रदेशातील एका जणांला रावेर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. आरोपीकडून दुचाकी आणि देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

साडेतीन हजारांची गावठी दारू जप्त
रावेर तालुक्यातील शेरी नाका जवळ कलू नारु भील (डावर, 50, सतापिंप्री, ता.झिरण्या, जि.खरगोन, मध्यप्रदेश) हा संशयीत दुचाकीवरून जात असताना पोलिसांनी त्यास अडवून तपासणी केली असता त्याच्याकडे तीन हजार पाचशे रुपये कपनीच्या देशी दारु बॉबी संत्रा कंपनीच्या 90 एम. एल. मापाच्या प्लास्टीकच्या सिलबंद 100 बाटल्या आढळल्याने त्या जप्त करण्यात आल्या तसेच 50 हजारांची दुचाकी (क्रमांक एम.पी.10 एन.सी.4610) जप्त करण्यात आली. कॉन्स्टेबल प्रदीप सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कलु नारु भिल याच्याविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विष्णू भील करीत आहेत.


कॉपी करू नका.