यावलनजीक दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक : भालशीव गावातील तिघे गंभीर जखमी


An unknown vehicle collided with a two-wheeler nearby : Three people from Bhalshiv village were seriously injured यावल : शहरातून टाकरखेडा जाणार्‍या रस्त्यावर एका वळणावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने यावल रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी तिघांवर प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ तिघांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

अपघातात तिघे गंभीर जखमी
यावल-टाकरखेडा रस्त्यावर बुधवारी सायंकाळी दुचाकीद्वारे मुकुंदा गंगाराम सोनवणे (32), नितीन हिरालाल तायडे (33) व शरद सोपान कोळी (33, तिघे रा.भालशीव, ता.यावल) हे जात होते. टाकरखेडा गावाजवळील वळणावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुजाकीला धडक दिली. या अपघातामध्ये तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना घटनास्थळावरून तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे, अधिपरीचारीका मंजुषा कोळेकर, कादर तडवी आदींनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.


कॉपी करू नका.