दिल्ली विशेष सेलचे पोलीस भुसावळात : सीमी प्रकरणातील ‘त्या’ शिक्षकाची जाणली माहिती


भुसावळ  : दिल्ली सेलच्या विशेष पोलिसांनी सीमी प्रकरणात भुसावळ पालिकेच्या उर्दू शाळेतील शिक्षक तथा संशयित हनीफ शेख मोहम्मद हनीफ यास अटक केली होती.

तपासादरम्यान विशेष सेलच्या अधिकारी यांनी बुधवारी भुसावळात येत शेख हनीफ शेख मोहंमद हनीफ याची काही महत्वपूर्ण माहिती येथील शासकीय कार्यालयातून प्राप्त केली. सीमी प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात 22 वर्षांपासून पसार असलेल्या येथील पालिकेच्या उर्दू शाळेतील शिक्षकाला न्यू दिल्लीतील विशेष सेलच्या पोलिसांनी गुरुवार, 22 फेब्रुवारीला दुपारी अटक केली होती. या प्रकरणी या सेलतर्फे आता तपासाला गती देण्यात आली आहे. या पथकातील काही अधिकारी हे बुधवारी शहरात आले होते. त्यांनी येथील प्रांताधिकारी कार्यालयातून काही महत्वपूर्ण माहिती जाणून घेतल्याचे सांगण्यात आले.


कॉपी करू नका.