महेलखेडी गावात खळ्याला आग : शेतीपयोगी साहित्य खाक


Barn fire in Mahelkhedi village : Agricultural materials destroyed यावल : यावल तालुक्यातील महेलखेडी गावात गुरूवारी दुपारी खळ्याला अचानक आग लागली. यात शेती साहित्य व गुरा-ढोरांचा चारा जळून खाक झाला. महेलखेडी गावातील माजी पंचायत समिती सभापती शोभा विलास पाटील यांच्या खळ्याला गुरुवारी दुपारी अचानक आग लागल्याने गावात एकच खळबळ उडाली.

आगीचे कारण अस्पष्ट
आग नेमकी कशा मुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. आग विझवण्यासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने धाऊन गेले. पोलीस पाटील यांनी तत्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली व येथे अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले व आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत शेती उपयोगी वस्तू व गुरा-ढोरांचा चारा झाळून खाक झाला आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले.


कॉपी करू नका.