मस्कावदच्या वयोवृद्धेची बस प्रवासात पोत लांबवली


Elderly woman of Maskavad had a prolonged bus journey सावदा : बसमधील गर्दीचा फायदा घेत भामट्याने मस्कावद येथील 71 वर्षीय वयोवृद्धेची पाच ग्रॅमची पोत लांबवली. याप्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कलाबाई रमेश भालशंकर (71, मस्कावद, ता.रावेर) ही वयोवृद्धा बुधवार, 27 मार्च रोजी दुपारी 12.15 ते 3.15 दरम्यान जळगाव ते मस्कावदसीम असा बसने प्रवास करीत असताना भामट्याने त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची व 11 हजार रुपये किंमतीची पोत लांबवली. याप्रकरणी वयोवृद्धेने सावदा पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक मजहर पठाण करीत आहेत.


कॉपी करू नका.