यावल शहरात अवैध दारू विक्री करताना एकास पकडले


One was caught while selling illegal liquor in Yaval city यावल : शहरातील भुसावळ रस्त्यावर 37 वर्षीय तरुणाला अवैद्यरीत्या देशी-विदेशी दारू विक्री करताना पोलिसांच्या पथकाने पकडले. ही कारवाई फैजपूर उपविभागीय कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग यांच्या पथकाने केली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर हॉटेल निधीमागे विकास केशव बढे (37, रा.महाजन गल्ली, यावल) हा तरुण आपल्याजवळ विविध प्रकारच्या देशी-विदेशी दारूच्या बॉटल विक्री करण्याच्या उद्देशातून बाळगतांना पोलिसांच्या पथकाला मिळून आला. ही कारवाई फैजपूर उपविभागीय कार्यालयाच्या सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने केली तरुणाकडून सात हजार 170 रुपयाच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तरुणाविरोधात यावल पोलीस ठाण्यात हवालदार सुमित बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !