भुसावळात चोरटे सुसाट : रेल्वे कर्मचार्‍याचे घर फोडून 43 हजारांचा ऐवज लांबवला


Burglary in Bhusawal : Railway employee’s house was broken into and compensation of 43 thousand was extended. भुसावळ : शहरातील रेल दुनिया परीसरातील रेल्वे कर्मचार्‍याचे बंद घर फोडून चोरट्यांनी 43 हजारांचा मुद्देमाल लांबवला. ही चोरी 28 ते 29 दरम्यान घडली. भुसावळ शहर पोलिसात याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळात चोरटे सुसाट : नागरिक धास्तावले
शुभम प्रभाकर वानखेडे (29) हे रेल्वे कर्मचारी रेल दुनिया परिसरात वास्तव्यास आहेत. ते गावाला गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी 28 ते 29 रोजीच्या मध्यरात्री साधत दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील दोन्ही कपाटांचे कुलूप तोडून सहा हजार रुपये किंमतीच्या लहान मुलांच्या अंगठ्या, चार हजार रुपये किंमतीची लहान अंगठी, चार हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पेंडल, दोन हजार रुपये किंमतीचे अर्ध्या ग्रॅम वजनाचे पेंडल, चार हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बाह्या, 16 हजार रुपये किंमतीचे व चार ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र, सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण 43 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !