कुर्हेपानाचे गावानजीक नशिराबादच्या व्यापार्याचे साडेदहा लाख लूटले
नाकाबंदी करून तिघा आरोपींचा मध्यरात्रीपर्यंत कसून शोध : व्यापारीवर्गात खळबळ

A merchant of Nashirabad near the village of Kurhepan was robbed of ten and a half lakhs भुसावळ : दुचाकीवरून जामनेरकडे निघालेल्या व्यापपार्याची दुचाकी अडवत धूम स्टाईल आलेल्या त्रिकूटाने व्यापार्याकडील दहा लाख 50 हजारांची रोकड लूटली. ही घटना भुसावळ तालुक्यातील कुर्हा पानाचे गावाजवळ बुधवारी रात्री 7 वाजेच्या सुमारास घडली. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पाळत ठेवून चोरीचा संशय
नशिराबाद येथील ऑईलचा व्यवसाय करणारे व्यापारी राजू कौरीया हे मोटरसायकलवर डबल सीट जामनेरकडे जात असताना कुर्हे गावाजवळ दुचाकीवर ट्रीपल सील तोंडाला रूमाल बांधून आलेल्या आरोपींनी त्यांची दुचाकी अडवत राजू कौरीया यांना धाक दाखवित त्यांच्या जवळील बॅग हिसकावून पलायन केले. दरम्यान, पाळत ठेवून ही चोरी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव
पोलिसांना घटनेची माहिती कळताच डीवायएसपी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक बबन जगताप, सहायक निरीक्षक विशाल पाटील यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी धाव घेतली. या भागातील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी सुरू असून जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. एलसीबीचे पथकही संशयीतांचा शोध घेत आहे. पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी केली मात्र रात्री उशिरापर्यंत आरोपी गवसले नाहीत.


