भुसावळात महिलेचा विनयभंग : चौघांविरोधात गुन्हा
molestation of woman in Bhusawal : Crime against four भुसावळ : शहरातील लक्ष्मी नगरात किरकोळ वादातून 33 वर्षीय महिलेच्या मानेवर मारहाण करीत तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना शुक्रवार, 5 रोजी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी चौघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
33 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपींनी शिविगाळ करीत मानेवर बुक्का मारला तसेच फिर्यादीच्या आईला शिविगाळ केली व तक्रारदाराचा विनयभंग केला. याप्रकरणी छाया हेंडे, जगदीश हेंडे, नेहा हेंडे, बंटी हेंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार तेजस पारीसकर करीत आहेत.