जळगावात कंपनी गोदामात ज्वलनशील पदार्थ टाकून आग : 18 लाखांचे नुकसान
In Jalgaon, fire caused by dumping flammable material in company godown : loss of 18 lakhs जळगाव : ज्वलनशील पदार्थ टाकून दिल्याने लागलेल्या आगीत आईस्क्रीम, तीन मोठे डीप फ्रीझर, ईलेक्ट्रीक पॅनल, स्टार्टर असा एकूण सुमारे 17 लाख 92 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल खाक झाला. जळगाव एमआयडीसीतील जी सेक्टरमधील रॉयल एजन्सीज ऑरग्यनिक फूडस कंपनीच्या गोडावूनमध्ये ही घटना सोमवार, 1 एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजता घडली. याप्रकरणी रविवार, 7 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे आगीचे प्रकरण
हुसेन अब्दुलभाई बोहरी (41, रा.कासमवाडी, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. आईस्क्रीम एजन्सी चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये रॉयल एजन्सीज ऑर्गेनिक फूडस कंपनीचे गोडावून आहे. या ठिकाणी आईस्क्रीमचा साठा ठेवला होता. त्यांच्या गोडावूनच्या बाजूला निधी इंटरप्रायझेस कंपनीचे मालक राजेश नेमीचंद कोठारी यांनी एकत्रीत असलेल्या खोलीच्या खिडकीचा काच फोडून ज्वलनशील पदार्थ गोदामाला आग लावली. ही घटना सोमवार, 1 एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजता घडली होती. या आगीत आईसक्रीम, तीन मोठी डीप फ्रीझर, ईलेक्ट्रीक पॅनल, स्टार्टर असा सुमारे 17 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जळून खाक झाला.
दरम्यान, याप्रकरणी हुसेन अब्दुलभाई बोहरी यांनी निशा इंटरप्रायझेस कंपनीचे मालक राजेश नेमीचंद कोठारी यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार चौकशी अंती रविवार, 7 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.