फुलगावात घरात शिरत संसारोपयोगी साहित्याचे नुकसान : तिघांविरोधात गुन्हा


Destruction of household goods by entering house in Phulgaon : Crime against three भुसावळ : भाडे तत्वावरील घरात शिरत घरातील महागड्या साहित्याचे नुकसान करण्यात आले. ही घटना भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे शनिवार, 6 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घर खाली करण्यावरून वाद
ज्योती महेंद्र पाटील (27, फुलगाव, ता.भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, त्या पती महेंद्र पाटील यांच्यासह दिलीप बबन मिस्तरी यांच्या घरात राहतात मात्र त्यांच्यात व घर मालकात घर खाली करण्यावरून वाद सुरू आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता तक्रारदार यांचे पती घरी नसताना संशयीत कल्पना दिलीप मिस्तरी, दिलीप बबन मिस्तरी व भूषण दिलीप मिस्तरी यांनी घरात प्रवेश करीत घरातील फ्रिज, कुलर, टीव्ही, गोदरेज कपाट, सीसीटीव्ही कॅमेरे, बेडसह इतर गृहोपयोगी साहित्याचे नुकसान अतिक्रमण करीत नुकसान केले. याप्रकरणी तिघांविरोधात भादंवि 448 व 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आमच्याविरोधात पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला असून आम्ही दिलेली तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नाही, असे महेंद्र पाटील यांनी सांगितले.


कॉपी करू नका.