सावदा शहरात आग : दोन दुकाने जळून खाक
Fire in Savada town: Two shops burnt down सावदा : सावदा शहरातील बसस्थानकाजवळील असलेल्या दोन दुकानांना सोमवार, 8 रोजी सायंकाळी सात वाजेदरम्यान अचानक आग लागल्याने दुकानातील साहित्य जाळून खाक झाले. या दुकानाला लागूनच दुकानांची रांग असून याच रांगेतील प्रथम एका गॅरेजमध्ये दुकान बंद असताना अचानक आग लागली.
वेळीच मिळाले आगीवर नियंत्रण
धुराचे लोट दिसू लागतात नागरीकांनी तिकडे धाव घेतली तोपर्यंत ही आग शेजारील दुकानात देखील पसरण्यास सुरवात झाली. सावदा पालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले व अखेरीस सुमारे अर्धा तासानंतर ही आग विझविण्यात यश आले. या आगीत गॅरेजमधील साहित्य, जुने टायर व इतर वस्तू मिळून हजारो रुपयांचे नुकसान झाले. रांगेत सुमारे 20 ते 22 दुकाने असून ही आग जास्त पसरली असती तर मोठी दुर्घटना घडली असती मात्र वेळेत या आगीवर नियंत्रण मिळाल्याने मोठे नुकसान टळले.आग विझविण्यासाठी सावदा नगरपालिका अग्निमन दलाचे अविनाश पाटील व त्यांचे सहकारी तसेच उपस्थित नागरीकांनी आग आटोक्यात आणली.