चाळीसगाव पालिकेच्या जलतरण तलावात बुडून चिंचखेड्यातील अल्पवयीन मुलाचा मृत्यू
A minor boy from Chinchkheda died after drowning in Chalisgaon Municipality’s swimming pool चाळीसगाव : चाळीसगाव नगरपरिषदेच्या जलतरण तलावात बुडाल्याने चिंचखेडा, ता.चाळीसगाव येथील 15 वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू ओढवला. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. अमन मनोहर निकम (15, चिंचखेडा, ता.चाळीसगाव) असे मयताचे नाव आहे.
झटके आल्यानंतर तलावात मुलाचा मृत्यू
जलतरण तलावाचे व्यवस्थापक महेंद्र प्रल्हाद चौधरी (48, चाळीसगाव) यांनी चाळीसगाव शहर पोलिसात दिलेल्या खबरीनुसार, सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांच्यासह गार्ड मधुकर चौधरी, शाम जाधव व सागर जाधव हे हजर असताना साडेतीन वाजेच्या सुमारास अमन निकम (15, चिंचखेडा) आला व त्याने स्विमिंग पुलात उडी घेतली मात्र काही वेळातच पाण्यात मुलाला झटके येत असल्याचे गार्ड मधुकर चौधरी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आवाज दिल्याने सर्व गार्ड यांनी मुलाला बाहेर काढत डॉ.राहुल वाघ यांच्या रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.