वैजापूर वनक्षेत्रात वनविभागाकडून वॉश आऊट : अडीच लाखांचा मुद्देमाल नष्ट


Wash out by forest department in Vaijapur forest area : 2.5 lakh worth of property destroyed यावल  : वैजापूर वनक्षेत्रात सोमवारी वनविभागाच्या पथकाने गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वसत केल्या. वनक्षेत्रात 35 टाकी (बॅरल) मध्ये सात हजार हजार लीटर रसायन व दारू मिळून 2.45 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे अवैधरीत्या दारू गाळणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली. अज्ञात व्यक्ती वरूध्द चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कार्यवाही वैजापूर वनक्षेत्रपाल एस.एम.सोनवणे, चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, वनपाल खलील याकुब शेख, वनपाल आश्विनी धात्रक, अर्चना गवते, आय.एस. तडवी, वनरक्षक सी.आर.कोळी, वंदना बारेला, संदीप ठाकरे, नोकेश बारेला, हुकार्‍या बारेला, हेमलता बारेला, सुनील भोई, संदीप भोई, भारसिंग बारेला, विजय शिरसाठ, बाजीराव बारेला, ज्योती बारेला, धनाबाई बारेला तसेच पोलीस नाईक शशिकांत पारधी, प्रमोद पारधी, वसंत कोळी, वनमजूर एकनाथ ढिवरे, काशीनाथ कोळी, सतीष पाटील, अरुण पाटील, लोटन सोनवणे व वनसेवक सुभाष पावरा, रोहन पावरा, लक्ष्मण बारेला, सुभाष बारेला, सुंदरलाल बारेला, जगदीश पावरा, रामजी बारेला, प्रताप कोकणी, सुशील कोळी, भागवत पाटील, निवृत्ती पाटील, निखील पाटील आदी 40 वन अधिकारी व कर्मचारी यांच्या समूहाने केली.


कॉपी करू नका.