जळगावातील तरुणाचा मारहाणीत मृत्यू : पाच आरोपींना अटक


Jalgaon youth beaten to death : Five accused arrested जळगाव : चोरी केल्याच्या संशयातून कांचन नगरातील 35 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी मयत नातेवाईकांनी आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर पाच संशयीतांना शनीपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी (35 कांचननगर, जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

खुनाने जळगावात खळबळ
जळगाव शहरातील कांचन नगरातील ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी (35) या तरुणाने नागरिकाच्या घरात चोरी केल्याचा संशय शेजार्‍यांना होता. या वादातून मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर याला सोबत घेऊन चार संशयीत दुचाकीवर बसवून घेवून गेले व नंतर ज्ञानेश्वर याचा मृतदेह असोदा शिवारात पडलेला असल्याची माहिती दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना मिळाली.

घटनेची माहिती कळताच लागलीच शनिपेठ, तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचार्‍यांसह ठसे तज्ञ ,फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. तरुणाचा बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याने दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पाच आरोपींना अटक करण्यात आली व त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी दिली.


कॉपी करू नका.